प्राथमिक शिक्षकांना निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी कर्तव्यात हजर राहण्यासाठी सूट द्यावी

नगर : जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर रोजी विविध तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकचे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडत आहे .या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच प्राथमिक शिक्षक - शिक्षिकेंनाही निवडणुकीचे नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. 


संबंधित गावामध्ये शनिवारी मुक्काम करावयाचा असून  रविवारी संपूर्ण दिवसभर मतदान होणार आहे. हे  मतदान पार पडल्यानंतर मतदानाचे साहित्य जमा करण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये यावे लागते .निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक सूचनानुसार मतदान पेट्या जमा करताना खूप काळजी घेतली जाते. त्यामुळे साहित्य स्विकारताना रात्री खूप उशीर होतो. 

या उशिरामुळे प्राथमिक शिक्षकांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. म्हणूनच रविवारी मतदान पार पडल्यानंतर मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार १९ डिसेंबरला प्राथमिक शिक्षकांना कर्तव्यावर हजर राहण्यासाठी सूट देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदन देऊन प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय संघाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अहमदनगर  जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसंघटक राजेंद्र निमसे , दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप आदींनी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत प्राथमिक  शिक्षकांना निवडणूक कार्यालयाने कर्तव्यात हजर होण्यासाठी सूट दिल्यास हे कर्मचारी अतिशय आनंदाने व नियमानुसार ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडतील असा विश्वास प्राथमिक शिक्षक संघटनांचा समन्वय संघाच्या सर्व प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post