जावयाकडून सासूला मारहाण

नगर - जावायाने सासूला शिवीगाळ, मारहाण करत हाताला चावा घेतल्याची घटना रविवारी दुपारी कवडेनगर येथे घडली. या प्रकरणी मनिषा कैलास पवार (वय 40 रा. रोकडे गल्ली, पिराचे मागे, रोकडे यांच्या घरात) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जावई गणेश भोसले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


रविवारी दुपारी मनिषा पवार या मुलगी दिव्या व जावई गणेश यांच्याकडे कवडेनगर येथे असताना ते घरातील सामान घेऊन दुसर्‍या ठिकाणी राहण्यास जात असताना मनिषा यांनी त्यांना,‘लोकांचे पैसे देऊन जा’, असे म्हटले. 

याचा जावई गणेश यांना राग आल्याने त्यांनी सासू मनिषा यांना शिवीगाळ, दमदाटी केली. सासू त्यांना समजून सांगण्यास गेली असता त्याचा राग येऊन जावई गणेशने सासू मनिषाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डाव्या हाताच्या पंजाला चावा घेऊन गंभीर दुखापत केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

मनिषा यांच्या फिर्यादीवरून जावई गणेश भोसलेविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post