श्रीरामपूर : शहरातील जीम मालकावर तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज विजय शिंदे असे आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच तो पसार झाला आहे. आरोपी शिंदे याची तरुणीशी ओळख झाली.
विवाहित असूनही त्याने तरुणीवर दोन वर्षे त्याच्या मालकीच्या जीममध्ये व पुणे येथे हॉटेलमध्ये अत्याचार केला. लग्न करण्यास नकार देऊन मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीने म्हटले आहे.
पुणे येथील फ्लॅटवर तसेच जीममध्ये बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. मंदिरामध्ये गळ्यात मंगळसूत्र घालत खोटे लग्न केले. शिवीगाळ व मारहाण केली.
आपल्याला तसेच भावाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. लग्न करणार नाही तसेच तुझ्याकडून केवळ फायदा करून घेतला आहे, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
श्रीरामपूर येथे आल्यावर वेळोवेळी फोन करून लग्नाचा हट्ट धरला. मात्र, आरोपी शिंदे याने बदनामी करण्याची व मारण्याची धमकी दिले. फोन स्वीकारण्याचे बंद केले.
शिंदेच्या घरी चौकशी केली असता तो विवाहित असल्याचे समजले. शिंदे याला दोन मुले आहेत, ही माहिती मिळाली अशी कैफियत पीडितेने मांडली आहे.
फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने तरुणीने बेलापूर येथील प्रवरा नदीच्या पुलावरुन उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तेथील नागरिकांनी तरुणीला वाचविले. त्यानंतर तरुणीला साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी शनिवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
Post a Comment