सोने चांदीच्या दरात घसरण....

मुंबई :  लग्न सराईत सोने व चांदीच्या दरात घसरण होत आहे. ही बाब सर्वांसाठी आनंदाची आहे. सोन्याचे दर घसरले आहेत. सोने तब्बल 300 तर चांदीचे दर 1000 रुपयांनी घसरले आहेत. गुरुवार 15 डिसेंबर रोजी भारतीय वायदे बाजार व आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरणीसह व्यापार करत आहेत.


वायदे बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 54,364 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता, जो कालच्या बंद किंमतीपेक्षा सकाळी 9:10 वाजेपर्यंत 310 रुपयांनी कमी होता. आज सोन्याचा भाव ५४,४८१ रुपयांवर खुला होता. मौल्यवान धातू काल ५४,६७८ रुपयांवर बंद झाला होता, जो त्याच्या आधीच्या बंदच्या तुलनेत ६५ रुपयांनी कमी होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post