नगर ः जिल्ह्यातील 203 पैकी 195 ग्रामपंचायतींसाठी रविवारी 81.71 टक्के मतदान झाले. गाववकर्यांनी कोणत्या गावकारभार्याला पसंती दिली आहे, हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे. कारभारी कोण राहणार यावर सध्या जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे.
जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला होता. यातील 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, पाच गावांत सदस्य बिनविरोध सरपंचपदासाठी लढत असे चित्र निर्माण झाल्यामुळे रविवारी प्रत्यक्ष 195 गावांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार
पडली. मतदानासाठी रांगा पाहायला मिळाल्या. तरुणांमध्ये मतदानाबाबत मोठी उत्सुकता दिसून आली. या वेळी गावाकडील निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. मतदान प्रक्रियेनंतर जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही.
प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे सगळीकडे वातावरण चांगले राहिलेले आहे. आता असेच वातावरण निकालानंतर रहावे, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. संवेदशील गावांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मात्र निकालानंतर इतरही गावात वादीवाद होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशानाने बंदोबस्ताचे नियोजन केलेेले आहे.
मतमोजणीनंतर उमेदवारांसह त्यांचे समर्थक नेहमीच गुलालाची उधळण करून मिरवणुका काढत असतात. याच दरम्यान वादीवाद वाढत असतात. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी मिरवणुकांवर प्रतिबंध घातला जातो. तसाच प्रतिबंध यावेळी राहण्याची शक्यता आहे.
गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेे आहे. ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून सर्वांचीच आहे. त्यामुळे निकालानंतर आता वादावादी टाळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निकालानंतर वादीवाद करणाणार्यांनी नेहमीच लक्षात ठेवावे, वादीवाद एका दिवसाचा राहणार आहे. मात्र त्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर न्यायालयीन तारखा अनेक दिवस चालणार आहे. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी जल्लोषासह आपल्या रागाव नियंत्रण ठेवल्यास पुढील अनर्थ टळण्यास मदत होणार आहे.
Post a Comment