दोहा : अत्यंत थरारक चुरशीचा अंतिम सामना अर्जेंटिना व फ्रान्स यांच्यामध्ये झाला. या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउट मध्ये फ्रान्स वर मात करून विश्वविजेत्या पदावर आपले नाव कोरले, अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा हा फुटबॉलचा विश्व कप जिंकला आहे.
सामन्याच्या सुरवातीपासून अर्जेंटिनाने आक्रमक खेळाला सुरुवात केली, पहिल्या 45 मिनिटाच्या हाफ टाईम मध्ये फ्रान्स वर 2 गोल करून विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केली.
अत्यंत थरारक चुरशीची फायनल मॅच मध्ये अर्जेंटिना विश्वविजेता अर्जेंटिना व फ्रान्स यांच्यामध्ये खेळलेल्या फायनल मॅच मध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउट मध्ये फ्रान्स वर मात करून विश्वविजेत्या पदावर आपले नाव कोरले, अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा हा फुटबॉलचा विश्व कप जिंकला आहे.
मॅचच्या सुरवातीपासून अर्जेंटिनाने आक्रमक खेळाला सुरुवात केली, पहिल्या 45 मिनिटाच्या हाफ टाईम मध्ये फ्रान्स वर 2 गोल करून विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केली.परंतु फुटबॉल हा असा खेळ आहे की शेवटच्या मिनिटाला काय होईल हे सांगता येत नाही, आणि तेच या मॅच मध्ये पहावयास मिळाले.
दुसऱ्या हाफ टाईममध्ये 80 मिनिटापर्यंत अर्जेंटिना 2-0 गोलने पुढे असताना अचानक फ्रान्सने 84 मिनिटाला पहिला गोल केला व 86 व्या मिनिटाला दुसरा गोल मारून 2-2 अशी बरोबरी साधून मॅच मध्ये मोठी रंगत आणली. फ्रान्स कडून दोन्ही गोल मॅकबो याने केले.
शेवटच्या दहा मिनिटांमध्ये फ्रान्सने दोन दोन अशी बरोबरी केली त्यामुळे या सामन्यांमध्ये अत्यंत चुरसनिर्माण झाली. अक्षरशा फ्रान्सने अर्जेंटिनाचा घास ओढून आणला जवळपास अर्जेंटिनाचा विजय निश्चित असताना फ्रान्सने शेवटच्या मिनिटांमध्ये केलेली खेळी ही उत्कृष्ट ठरली. त्यामुळे 90 मिनिटाच्या खेळामध्ये दोन्ही संघ बरोबरीत राहिले .
त्यानंतर 30 मिनिटाच्या एक्स्ट्रा टाईम मध्ये पहिल्या 15 मि. हाफ मध्ये कोणत्याही संघास गोल झाला नाही, दुसऱ्या हाफ मध्ये मेस्सीने उत्कृष्ट असा गोल करून अर्जेंटिना 3-2 झाला. एक गोलने पुढे असताना पुन्हा शेवटच्या पाच मिनिटांमध्ये अर्जेंटिनाच्या खेळाडूचा हॅन्ड झाल्यामुळे फ्रान्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला त्यावर फ्रान्सच्या मॅकबोव याने गोल मारून पुन्हा तीन-तीन अशी बरोबरी साधली.
अत्यंत चुरशीच्या आणि रोमहर्षक सामन्यामध्ये तीन-तीन एक्स्ट्रा टाईम मध्ये गोल झाल्याने शेवटी पेनल्टी शूटआउट मध्ये अर्जेंटिनाने विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले.
Post a Comment