श्री दत्त जयंती निमित्त पायी दिंडी पालखी सोहळा

निघोज : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशाप्रकारे दत्त नामाचे नामस्मरण करीत वडझिरे, निघोज, जवळा या परिसरातील गुरुदेव दत्त भावीकांनी श्री क्षेत्र नारायणपूर पर्यंत दिंडी सोहळ्याचे आयोजन केले असून ठिकठिकाणी या दिंडींचे जोरदार स्वागत होत आहे. 


नामस्मरण, किर्तन प्रवचन भजन महाप्रसाद आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून शेकडो भक्त भाविक नामस्मरणात तल्लीन झाले आहेत. दिंडी सोहळ्याचे हे १८ वे वर्षं असून बुधवार दि. ३० रोजी हा दिंडी सोहळा वडझिरे येथून निघाला असून वडझिरे, निघोज,जवळा, राळेगण थेरपाळ,करडे, देशमुख वस्ती,आंबळे, खोपोडी, केडगाव, मोरगाव, जेजुरी मार्गे मंगळवार दि. ६ रोजी श्री क्षेत्र नारायणपूर येथे या दिंडी सोहळ्याचा समारोप होणार आहे. 

बुधवार दि. ७ रोजी दत्त जयंती असून या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित असतात. लक्ष्मण दिघे, ठकाराम गायखे,बाबाजी काळे, अर्जुन करकंडे, अशोक ठुबे, महादू लंके, भास्कर पोलादे, सचिन मोरे, भाऊसाहेब मोरे, बाळासाहेब एरंडे, लहुजी बरशिले, अशोक आढाव, सोपान मोरे, बाबाजी मोरे, नितीन मोरे, राहुल बरशिले, दिपक सालके, गोरख पठारे, भिमाजी जाधव, भास्कर जाधव, ठकाजी राउत,श्रीपत राउत, विठ्ठल लंके,श्रीपत शेटे, शंकर लंके, राधाबाई लंके, कमल लंके,समाबाई बोरकर, वैशाली बोरकर तसेच वडझिरे,निघोज,जवळा ग्रामस्थ व 

जय भवानी भजनी मंडळ जाधववाडी, भैरवनाथ भजनी मंडळ पाडळी दर्या, राउतबाबा भजणी मंडळ राऊतवाडी, विठ्ठल रुक्मिणी दिंडी सोहळा व भजणी मंडळ वडझिरे,नियोजन करण्यात अग्रेसर आहेत. 

लोकनेते निलेशजी लंके प्रतिष्ठान, आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, युवा नेते अनिल गंधाक्ते, सरपंच निलेश केदारे, उपसरपंच ऋषिकेश दिघे तसेच शेकडो पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी या दिंडी सोहळ्यासाठी सहकार्य केले आहे. 

गायक ठकाजी राउत, प्रवचन सेवा भिमाजी महाराज लंके, प्रवचनकार व किर्तनकार शिवाजी महाराज रेपाळे यांनी प्रवचन, भजन किर्तन या माध्यमातून ठिकठिकाणी प्रबोधन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post