निघोज : आपल्या मतदारसंघाची घडी पुर्णपणे विस्कटली आहे. ती सुरळीत होत नाही तोपर्यंत आपण राजकारणातून निवृत्त होणार नाही, असा इशारा माजी आमदार विजय औटी यांनी दिला आहे. वाढदिवस ही आरोग्य शिबिराची संकल्पना असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले.
निघोज येथील कपिलेश्वर मंगल कार्यालयात पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल व भास्करराव शिरोळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार विजय औटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ श्रीकांत पठारे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ भास्करराव शिरोळे, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख प्रियंका खीलारी, बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे,निघोज सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब लामखडे, माजी उपसरपंच उमेश सोनवणे, निघोज- आळकुटी जिल्हा परिषद गटाच्या महिला आघाडी प्रमुख पायल पांढरकर, निघोज- आळकुटी जिल्हा परिषद गटाचे प्रमुख बाबाजी तनपुरे, वडनेरचे माजी सरपंच पांडुरंग येवले, संजय मते,संजय ठुबे, रुपेश ढवण, महेंद्र पांढरकर, रमेश वाजे, अनिल न-हे, निवृत्ती महाराज तनपुरे, अर्जुन वराळ, प्रविण चौधरी, प्रकाश पांढरकर, विशाल घोलप आदी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी आमदार औटी यावेळी म्हणाले शिवसेनेने मुंबई येथे स्थापनेपासून आरोग्य शिबिर घेउन मराठी माणसाची सेवा केली आहे. तोच उपक्रम सातत्याने सुरू ठेवीत डॉक्टर भास्करराव शिरोळे यांनी निघोज-आळकुटी जिल्हा परिषद गटात आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर घेतले आहे.
शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्य शिबिर घेउन चांगले सामाजिक काम केले आहे. तालुक्यातील परस्थीती अत्यंत बिघडली आहे. आपल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात काय झाले काय नाही याची माहिती जनतेला आहे. तालुक्याची विस्कटलेली घडी जो पर्यंत व्यवस्थीत बसत नाही तो पर्यंत आपण राजका निवृत्त होणार नाही असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.
नेते सबाजीराव गायकवाड यांनी अत्यंत प्रामाणिकपणे शिवसेना तालुक्यात वाढवली, बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे यांच्या सारखे निष्ठावंत कार्यकर्ते त्यावेळी बरोबर होते. बऱ्याच दिवसानंतर वरखडे या कार्यक्रमाला आल्याबद्दल माजी आमदार औटी यांनी समाधान व्यक्त केले. या शिबीरासाठी दोनशे पेक्षा जास्त रुग्ण यावेळी उपस्थित होते.
बाबाजी तनपुरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विशाल घोलप यांनी आभार मानले . शिवसेना तसेच सामाजिक संघटना हे शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
दुपारी चार वाजेपर्यंत या शिबीरात दोनशे पेक्षा जास्त नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली.तसेच यामध्ये अनेक रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आली. ज्यांना मोतिबिंदू आहे. त्यांच्यावर अल्प दरात पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये दोन दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येणार असून जवळपास पन्नास पेक्षा जास्त रुग्णांना याचा फायदा मिळणार आहे.
निघोज आणी परिसरातील ऋदयरोग रुण्गांसाठी आठवड्यातून एक दिवस ऋदय तपासणीसाठी नियमीतपणे संपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार असून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर भास्करराव शिरोळे यांनी दिली आहे.
डॉक्टर शिरोळे यांचा सेवाभाव महत्वपूर्ण असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत निघोज पंचायत समिती गणात त्यांना पाठबळ देणार असल्याची ग्वाही माजी उपसरपंच उमेश सोनवणे यांनी यावेळी दिली.
Post a Comment