लालमुळे गावरान कांद्याच्या दरात घसरण...

नगर : लाल कांद्याची आवक हळूहळू वाढू लागल्याने गावरान कांद्याचे दर उतरले आहेत. लाल कांद्याला गावरानपेक्षा जास्त भाव मिळत आहे. नेप्ती उपबाजार समितीत काल झालेल्या लिलावात प्रथम प्रतीच्या लाल कांद्याला १७०० ते २२०० रुपये, तर गावरान कांद्याला ९०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.


लिलावात गावरान कांद्याच्या ६४ हजार १३९ गोण्यांची आवक झाली. त्यात प्रथम प्रतवारीला ९०० ते १३००, द्वितीय प्रतवारीला ६०० ते ९००, तृतीय प्रतवारीला ३०० ते ६००, चतुर्थ प्रतवारीला १०० ते ३०० रूपये भाव मिळाला. दुसरीकडे याच लिलावात ५ हजार ८७५ गोण्या लाल कांद्याची आवक झाली. त्यात प्रथम प्रतवारीला १७०० ते २२००, द्वितीय प्रतवारीला १३०० ते १७००, रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

गावरान कांद्याची आवक मोठी असली तरी भाव मात्र कमी मिळत असल्याचे चित्र आहे. त्या तुलनेत लाल कांद्याला जास्त भाव मिळू लागला आहे. काही प्रमाणात लाल कांदाही बाजारात येऊ लागला आहे. त्याला दीड ते सव्वादोन हजारांपर्यंत भाव मिळत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post