लोकसेवा परीक्षेत संधी न मिळाल्यास पंचायत समिती निवडणूक लढवा...

पुणे : एमपीएससीची पोस्ट नाही निघाली तर पंचायत समितीची निवडणूक लढवा असा अजब सल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिला आहे. 


पुण्यात आज, गुरुवारी ते स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा अजब सल्ला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

पडळकर म्हणाले, एमपीएससी निघाली नाही तर निराश होऊ नका, गावाकडे जाऊन निवडणूक लढवा. एमपीएससीला खूप स्पर्धा आहे. जवळपास २०-२१ तास मुले अभ्यास करतात. तर, तुम्ही नैराश्यात जाऊ नका, निराश होऊ नका. इथे तुम्हाला संधी नाही मिळाली तरी गावाकडे अनेक संध्या आहेत. 

त्या संध्यांचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. एमपीएससीचा पोरगा गावचा सरपंच झाला तर बिघडलं कुठं? एमपीएससीचा पोरगा गावाकडे येऊन सभापती झाला तर वाईट काय आहे? असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे. पडळकरांच्या या अजब सल्ल्याची सध्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post