काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाचपुते बंधुंचे उमेदवारी अर्ज दाखल

अमर छत्तीसे

श्रीगोंदा : तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या काष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी साजन पाचपुते व आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. 


श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत ची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून या निवडणुकीत सरपंच पदासाठी आज माजीमंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

त्याचबरोबर स्वर्गीय सदाशिव आण्णा पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते, सुदर्शन पाचपुते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाचपुते कुटुंबातील राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायत साठी उमेदवारी दाखल केली असल्यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. 


मात्र माघारी घेण्यासाठी अवधी असल्यामुळे साजन पाचपुते नेमकी काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post