उदयनराजे यांची भूमिका आक्रमक... इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं...


रायगड :
 राज्यपाल यांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असंही उदयनराजे यांनी म्हटले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

पारनेरात बिबट्या जेरबंद...

 

सातत्याने शिवाजी महाराज यांचा अवमान केला जात असल्याने उदयनराजे यांनी स्पष्टच शब्दात रायगडावरुन राजकारण्यांची कान उघडणी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह त्यांनी भाजपलाही चांगलंच सुनावले आहे. सर्वच पक्षांनी सोईनुसार महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. 

यापुढे हे चालणार नाही म्हणत सर्वच राजकारण्यांची लाज काढली आहे. उदयनराजे यांनी सर्वधर्म समभाव हा शिवाजी महाराजांनी अमलात आणला होता, तो फक्त नावालाच राहिल्याने उदयनराजे यांनी त्यावरून हल्लाबोल केला आहे. वेगवेगळी विधाने करून देशाचे तुकडे होतील, देश महासत्ता होणार नाही असेही ते म्हणाले.

उदयनराजे यांनी भूमिका आक्रमक घेतल्याने आता भाजप काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post