तेली समाजाचा 11 रोजी राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय मेळावा

 नगर - जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच (ट्रस्ट) व प्रदेश तेली महासंघ यांच्यावतीने 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वा. माऊली संकुल, सावेडी, नगर येथे भव्य मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश तेली महासंघाचे सेक्रेटरी विजय काळे यांनी दिली.

 


या कार्यक्रमासाठी तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी आदिंसह सामाजिक, अध्यात्मिक, उद्योजक आदि मान्यवर या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मेळावा समितीचे अध्यक्ष सोमनाथ देवकर यांनी दिली.

 

मेळाव्यातील स्टेजवर येऊन परिचय देणार्‍या वधू-वरांचा  लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यातील (वधू व वरास) प्रथम- 32 इंची एलईडी टीव्ही, द्वितीय - वधूस पैठणी, वरास सूट फॅब्रीक, तृतीय - घड्याळ देण्यात येणार आहे. मेळाव्यात  सहभागी वधू-वरांसह पालकांना संत श्री संताजी महाराजांची चरित्र, वधू-वर रेशिमगाठी माहिती पुस्तिका भेट देण्यात येणार आहे. तसेच सर्वांसाठी चहा, नाष्टा, भोजन व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. 

 

या मेळाव्यास समाजातील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन संताजी विचार मंच (ट्रस्ट)च्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अरविंद दारुणकर (मो.9850464949), सोमनाथ देवकर (मो.9850507313), विजय काळे (मो.9422221494)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post