शरद पवार यांची खेळी...

मुंबई : अजित पवार भुलले असतील असं मला वाटत नाही. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी दुसरा काही पर्याय नव्हता. ती उठवण्यासाठी शरद पवारांनी केलेली ही खेळी असू शकते. 


त्यामुळे अजित पवारांनी त्यावेळी जी विधान केली आहे. त्याला आज महत्त्व द्यावे असे मला वाटत नाही, असे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  

देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे सत्ता स्थापनेसाठी शपविधीचा कार्यक्रम उरकला होता. या शपथविधी सोहळ्याच राजकारणात एकच धक्का बसला होता. 

अजित पवार यांना सत्ताधारी अनेकदा पहाटेच्या शपथविधीवरुन लक्ष्य करत असतात. दरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. जयंत पाटलांच्या या विधानामुळे राजकारणात नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, त्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंच्या  नेतृत्वात सरकारमध्ये त्यांनी काम केले. राष्ट्रवादी फुटली नाही, तर शिवसेनेचे आमदार गेल्याने सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत साथ दिली हे नाकारता येणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post