बिबट्याचा हल्ला

राहाता : तालुक्यातील कोर्‍हाळे येथील शेतकरी बबन बाजीराव ढगे (वय 65) यांच्यावर बिबट्याने बुधवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान हल्ला केला.


शेतकरी बबन ढगे यांना रात्री बारा वाजेच्या दरम्यान आपल्या घराजवळ असणार्‍या जाळीतील कोंबड्या  जास्त फडफडण्याचा आवाज आल्याने त्यांनी कोंबड्यांच्या जाळीच्या जवळ जाऊन बघितले असता जाळीमध्ये बिबट्या आढळून आला. 

त्यांनी जाळीचा दरवाजा उघडला असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या हाताला तोंडात धरून फरपटत ओढत नेत असतांना त्यांचा मुलगा व सून यांनी त्यांना बिबट्याच्या तावडीतून सोडवले.

त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला त्यांच्या हाताला बिबट्याचे दात लागले असून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला. त्यांना रात्री  शिर्डी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे. यामध्ये या कुटुंबाचे 100 कोंबड्यांचे नुकसान झाले आहे. 

या झालेल्या आर्थिक नुकसानीचा संबंधित विभागाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post