अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्यातील शेतकर्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते मात्र गावपातळीपासून तालुक्याचे व जिल्ह्याचे नेतृत्व करणार्या नेते मंडळीला दिसत नाही. विशेष म्हणजे पाणी प्रश्नावर कोणी बोलत नाही. मात्र हीच नेते मंडळी लग्न सोहळ्यासह इतर कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहे. नेत्यांच्या या धोरणावर शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
तालुकक्यातील जिल्हा परिषदेची माजी सदस्य व पंचायत समिती माजी सदस्य सध्या आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन गट व गणातील लग्नसोहळ्यासह दशक्रिया, वर्षश्राद्ध व इतर कार्यक्रमांना हजेरी लावून गाठीभेटी घेत आहेत.
या माध्यमातून प्रत्येकजण आपले आपले वर्चस्व निर्माण करीत आहे. मात्र या नेते मंडळीला शेतकर्यांचे प्रश्न दिसत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला आहे. तालुक्यात कुकडीचे पाणी प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या प्रश्नाकडे स्थानिक नेते मंडळी कुकडी आवर्तनाबाबत कोणीच बोलत नाही, हे विशेष.
श्रीगोंदा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी वर्गाचे नेते म्हणून माजी पंचायत समिती सदस्य व भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र म्हस्के हे तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी वर्गाचे नेते म्हणून ओळख आहे.
सध्या कुकडीचे आवर्तन सुटल्यानंतर म्हस्के यांनी पाण्याबाबत ठोस भूमिका घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे पूर्व भागातील आढळगाव जिल्हा परिषद गटातील एकही नेत्याने कुकडीच्या आवर्तनाबाबत ब्र शब्द काढला नाही.
माजी जिल्हा परिषद सदस्य पंचशीलाताई गिरमकर, गणाचे सदस्य माजी उपसभापती मनिषा कोठारी आदी कुकडीच्या पाण्यावर बोलत नाही. विशेष या नेते मंडळींना पाण्याबाबत बोलायचे नाही की माहिती नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Post a Comment