चंद्रपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल भाजप नेत्यावर कारवाई करण्यात आली आहे.
खेमदेव गरपल्लीवार असे या व्यक्तीचे नाव आहे. चंद्रपूर पोलिसांनी खेमदेव गरपल्लीवार याला वर्षभरासाठी तडीपार केले आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरुन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी खेमदेव गरपल्लीवार याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात हा प्रकार घडला आहे.
खेमदेव गरपल्लीवार याने काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. अमृता फडणवीस यांनी त्यांचे एक पंजाबी गाणे प्रदर्शित झाल्यानंतर वेश्या व्यवसायावर मत मांडलं होते. त्यावर गरपल्लीवार याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.
गरपल्लीवार याच्या पोस्टमुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Post a Comment