विखे म्हणतात... तांबे मला भेटले....

नगर : सत्यजित तांबे मला भेटले असून माझ्याशी चर्चा केली. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते निर्णय करतात आणि सत्यजित तांबे यांना निवडून आणण्याचा निर्णय आता कार्यकर्त्यांनी केला, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.


नाशिक पदवीधर मतदारसंघातील सस्पेन्स संपला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजप उघड पाठिंबा देणार नसला तरी स्थानिक पातळीवर तांबे यांचच काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे मला भेटले, माझ्याशी चर्चा केली. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते निर्णय करतात. यावेळी सत्यजित तांबे यांना निवडून आणण्याचा निर्णय आता कार्यकर्त्यांनी केला असल्याचे नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. 

भाजपने जरी सत्यजित तांबे यांना पाठींबा दिला नसला आणि स्थानिक पातळीवर निर्णय होईल, असं सांगितलं असले तरी सत्यजित तांबे आपल्याला भेटले का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना मंत्री विखे पाटील यांनी हे उत्तर दिले आहे. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याला माझा ना नसेल, भाजपची मत विभाजित होणार नाही ती एकालाच मिळेल. त्यामुळे भाजपची मत निर्णायक ठरतील, असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देईल, असे स्पष्ट संकेत आता भाजपकडून मिळाले आहेत

या संदर्भात स्थानिक नेते हे बैठक घेऊन कोणत्या अपक्षाला मतदान करायचा याचा निर्णय घेईल, आम्ही अपक्षाला मतदान करणार असा निर्णय भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून घेतला आहे. मात्र, शुभांगी पाटील यांना मतदान करणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post