शिक्षकाकडून विद्यार्थीनींशी गैरकृत्य... शिक्षकी पेशाला काळीमा फासला...

कोल्हापूर : शिक्षक म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान देत त्यांना मोठे करायचे काम घडवत असतात. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य घडत असते. मात्र असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एका शाळेत शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 


या शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाने नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत मुलींसोबत गैरकृत्य केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. 

याबाबत संबंधित पीडित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संतप्त झालेले पालकांनी शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबतची तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षकाने पुन्हा मुलींना धमकी देण्याचे प्रकार करू लागला.

यामुळे मुख्याध्यापकांनी तातडीने येथील गावच्या पोलिस पाटलांना बोलवून घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र यावेळी संबंधित शिक्षक हा शाळेत आलाच नाही. यामुळे गावकऱ्यांनी त्याची उचलबांगडी करण्याची मागणी केली. 

त्यानुसार संबंधित शिक्षकाचे सातारा जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश मुख्याध्यापकांनी देत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असले तरी संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी येथील विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post