नगर : आम्हाला शंभर टक्के खात्री आहे, सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित आहे. दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
विखे म्हणाले की सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असल्याने इतर उमेदवार यांची चर्चा करण्याची गरज नाही. मामाची भूमिका बजवण्यापेक्षा मामाने पक्षाला मामा बनवले आहे असे म्हणून बाळासाहेब थोरात यांना चिमटा काढला आहे.
स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे पक्षाच्या वतिने जाहीर करण्यात आले होते, त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे सांगितले आहे अशी प्रतिक्रिया यापूर्वीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती.
त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजपने उघड पाठिंबा दिल्याची परिस्थिती बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आहे, याचाच आधार घेऊन भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजयाचा दावा केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या भाच्याला म्हणजेच सत्यजित तांबे यांना उघड पाठिंबा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
Post a Comment