नगर : माजी मंत्री शिवाजी कर्डिले गटाला धक्क बसला आहे. चिचोंडी पाटीलच्या सरपंचपदी शरद पवार यांच्या निवडीचा कर्डिले गटाला धक्का बसला आहे.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील सरपंचपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये महाविकस आघाडीचे नेते शरद पवार यांची नूतन सरपंचपदी निवड झाली आहे. भाजप आणि माजी आमदार राहुल जगताप यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणारे अशोक कोकाटे व अपक्ष उमेदवार वैभव कोकाटे यांचा पराभव झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक वेळी असणारे सत्ता समिकरण बदलून वेगळ्या आघाड्या यावेळी तयार झाल्या आहेत.
यापूर्वी भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे हे सरपंच होते. आता महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली असून शरद पवार यांना सरपंच पदावर विरामान करून शिवसेनेचे सभापती प्रवीण कोकाटे या निवडणुकीत किंगमेकर ठरले आहेत .सरपंच पदासाठी शरद पवार यांना 9 मते पडली आहेत तर अशोक कोकाटे यांना सहा मते मिळाली.
ही ग्रामपंचायत एकूण १५ सदस्यांची आहे. यापैकी ८ सदस्य पंधरा दिवसापूर्वीच सहलीला गेले होते. ते परत आले व सर्व नाट्यमय घडामोडी घडल्या.

Post a Comment