पंकजा मुंडे अडचणीत....

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को- ऑप बँकेला बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे. 


24 जानेवारी रोजी कोट्यवधींच्या गैरव्यवहारासंदर्भात ही नोटीस बजावली असून 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे बँकेला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

परळी वैद्यनाथ येथील  ही बँक पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. या बँकेच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे या संचालक आहेत. उस्मानाबादच्या कळंब येथील शंभू महादेव कारखान्याच्या लिलावात अटी, शर्थीचे उल्लंघन केल्याचा वैद्यनाथ बँकेवर आरोप आहे.

वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे सभासद सुभाष कारभारी निर्मळ  यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात पाच जानेवारी 2023 रोजी अर्ज देऊन गैरव्यवहराची चौकशी करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती.

या संदर्भात तक्रारीचे अर्ज आल्याने पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तपासाचा भाग म्हणून, दि. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेला पोलिसांनी नोटीस पाठवली असून 31 जानेवारीला समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे बँकेला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सुभाष कारभारी निर्मळ यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार करत वैद्यनाथ बँकेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधीक्षक संतोष वाळके यांनी सहायक निरीक्षक सुजित बडे यांच्याकडे चौकशी सोपविली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post