नाशिक पदवीधरसाठी अवघ एव्हढचं मतदान....

नाशिक : नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील  2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले असून 49.28 टक्के मतदान झाले आहे. 


विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 69 हजार 652 मतदारापैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदारापैंकी 58 हजार 283  इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान झाले आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 23 हजार 412 मतदारापैंकी  11 हजार 822 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 50.50 टक्के मतदान झाले आहे. 

जळगाव जिल्ह्यात एकूण 35 हजार 58 मतदारापैंकी 18 हजार 33 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 51.44 टक्के मतदान झाले आहे. 

नंदूरबार जिल्ह्यात एकूण  18 हजार 918 मतदारापैंकी 9 हजार 385 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 49.61 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post