श्रीगोंदा खरेदी-विक्री संघाची निवडणूक होणार...?

श्रीगोंदा :श्रीगोंदा छत्रपती शिवाजी महाराज खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज मंगळवारी (दि. ३१) अखेरचा दिवस आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी प्रयत्न सुरु आहेत. पण ही निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा मतदारांची आहे.


खरेदी-विक्री संघ निवडणुकीत १३ जागांसाठी १४२ जणांचे उमेदवारी अर्ज आहेत. एव्हढे अर्ज असल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता आहे. नेते मंडळी इच्छुकांची मनधरणी करीत आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या . निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस यांच्या निवासस्थानी बैठक झाली. 

राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे भगवानराव पाचपुते आदींनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केेले आहे.

खरेदी-विक्री संघ निवडणुकीत १३ जागांसाठी १४२ जणांचे उमेदवारी अर्ज आहेत.  प्रत्येकाला वाटते आपला बिनविरोधमध्ये नंबर लागेल. या दृष्टीने अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे बिनविरोधची शक्यता कमी दिसून येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post