राष्ट्रीय मतदार दिन साजरा....

नेवासा : नेवासा तहसील कार्यालय,  शिक्षण विभाग पंचायत समिती नेवासा व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा येथे राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले.


राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने मतदार जागृती करण्यासाठी नेवासा तालुक्यात मागिल १५ दिवसात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे इयत्ता पाचवी ते आठवी हा लहान गट तर इयत्ता नववी ते बारावी या मोठ्या गटातून प्रत्येकी प्रथम तीन व एका उत्तेजनार्थ विद्यार्थ्याची निवड करण्यात आली.

सदर स्पर्धेकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेली माझ मत माझ भविष्य ही थीम व मतदार जागृती विषयक विविध विषय देण्यात आले होते. सदरच्या स्पर्धेत विजयी एकुण ४० विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमात तहसील कार्यालय नेवासा यांचे मार्फत प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले.


यावेळी सदर स्पर्धेमध्ये पारदर्शकपणे परीक्षक म्हणुन काम केलेबद्दल श्री साळुंखे, सुप्रिया झिंजुर्डे, श्री रवी महागावे, प्रकाश पटेकर, उघडे यांचा देखिल सत्कार करण्यात आला. यावेळी  सन २०२२-२३ या वर्षात मतदार यादीसोबत आधारजोडणीचे कामात उत्कृष्ट काम केलेले बीएलओ प्रविण शिर्के (शिक्षक), सविता दरंदले (अंगणवाडी सेविका), अण्णासाहेब डेंगळे (ग्रामसेवक) यांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयातील वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना- नवमतदारांना मतदार नाव नोंदणीसाठी फॉर्म नंबर 6 चे वाटप करण्यात आले. यानंतर वक्तृत्व स्पर्धेत नेवासा तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी लहान(इ.५वी ते ८वी)गटातुन कु.गायत्री गणेश घुले इ ५वी कुकाणा माध्यमिक विद्यालय आणि मोठ्या (इ ९वी ते १२वी)गटातुन कु.आरती गणपत पुंड इ १२वी जवाहर मध्यमिक विद्यालय चांदा या विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व सादर केले.

तसेच उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी यांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ देण्यात आली. सर्वांना मतदार नोंदणी करणे तसेच आगामी निवडणुकांत उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावणे कामी श्री किशोर सानप नायब तहसीलदार यांनी आवाहन केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. शिवाजी कराड गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती नेवासा हे उपस्थित होते. अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कल्हापुरे, उपप्राचार्य अहिनर, मोटे, श्री. भास्कर नरसाळे, साळुंखे,  मदन लाड, अप्पा फलके तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन शेख समी शिक्षण विभाग नेवासा यांनी केले.   उपप्राचार्य आयनर यांनी आभार केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post