नेवासा : भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी जाहीर केलेल्या तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2023 या कार्यक्रमांतर्गत नेवासा तालुक्यामध्ये तहसील कार्यालय नेवासा व पंचायत समिती शिक्षण विभाग नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव गंगा या शाळेतील इयत्ता सातवी चा विद्यार्थी अनंत सोमनाथ शिंदे याने घोषवाक्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे.
नुकतेच याचे पारितोषिक वितरण मुळा एज्युकेशन संस्थेचे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा या ठिकाणी नायब तहसीलदार सानप, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, प्राचार्य गोरक्षनाथ कल्हापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या विद्यार्थ्याला वर्गशिक्षक भास्कर नरसाळे, राजाभाऊ बेहळे, अमोल काळे प्रवीण कुमार हराळ नितीन डहाळे राहुल गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, गटविकास अधिकारी संजय दिघे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, मुख्याध्यापक हरिभाऊ जाधव आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment