चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांची कामगिरी उल्लेखनिय... प्रजासत्ताक दिन साजरा...

नगर ः नागापूर येथील चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात वातावरणात साजरा झाला.


संस्थेचे सचिव बबनराव कातोरे यांच्या हस्ते शाळेत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी रावसाहेब सप्रे, प्राचार्य रावसाहेब सातपुते, सतीष बनसोडे, मुख्याध्यापिका मनीषा कासार, उद्योजक भांड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र आगलावे यांनी केले. आश्विनी सप्रे यांनी आभार मानले.


या वेळी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमधून आपली मनोगते व्यक्त केली. सहावीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम डान्स सादर केला. त्यासाठी शिरोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीत काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.


चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांनी पोलिस परेड ग्राउंडवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्यांना क्रांती सानप व वर्षा कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post