परभणी : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची युती तुटली आहे. कालच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय भाष्य केलं ते तुम्ही पाहिलं असेल.
त्यांनी मोदींची स्तुती केली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईचं समर्थन केले आहे. त्यामुळे दोघांची युती तुटल्याचे स्पष्ट आहे, असा दावा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.
कडू म्हणाले की, सर्वांना चांगली रात्री झोप लागते. आणखी चांगली झोप लागली पाहिजे म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवला जातो. आता मंत्रिमंडळात 20 लोकांना संधी मिळेल. त्यामुळे बाकीचे नाराज होतील.
त्यांना झोप लागणार नाही. त्यामुळे त्यांनी चांगली झोप घ्यावी म्हणून विस्तार लांबवला जातोय, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी नाराज नाही. माझ्या चेहऱ्यावरून कुठेच वाटत नाही मी नाराज आहे. मीच फटाके फोडतो, असंही त्यांनी सांगितले.
Post a Comment