नगर : सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याबद्दल लवकरच पक्ष भूमिका जाहीर करणार आहे. पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्ते काम करतील असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढत असून यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यावर विखे पाटील म्हणाले की, त्यात सत्यजित तांबे आणि भाजपचे समीकरण काय याबद्दल अजूनही अधिकृत अशी स्पष्टता प्राप्त झाली नाही.
त्यात आता भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल लवकरच पक्ष भूमिका जाहीर करणार आहे. पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्ते काम करतील असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


Post a Comment