सत्यजित तांबे यांना भाजपची ऑफर ...

मुंबई :  सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये येण्यास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुली ऑफर दिली आहे. सत्यजित तांबे यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून निवडणुकीमध्ये मदत झाली  आहे. या जागांवर यापूर्वी विधानपरिषद निवडणुकीत जे निकाल आले, त्यापेक्षा हे निकाल चांगले असतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.


पदवीधर शिक्षक मतदानाच्या निकालात भाजप व युतीला जास्त यश मिळणार आहे. चार जागा आम्ही लढवल्या होत्या, नागपूरच्या जागेवर आम्ही समर्थन दिले. होते.  सत्यजित तांबे यांना स्थानिक भाजपने समर्थन दिले आहे. त्यामुळे निकाल चांगले येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

जर सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत आहे. आमची त्यांना भाजपात घेण्याची तयारी आहे. सत्यजित तांबे यांनी निर्णय घ्यावा, ते आले तर आम्ही कधीही तयार आहोत.  सत्यजित तांबे आले किंवा इतर कुणी आले. पक्षात यायला अडचण नाही. तर सत्यजित तांबे आले तर आम्ही स्वागत करु, असे म्हणत बावनकुळेंनी तांबेंना खुली ऑफर दिली आहे.

आता तांबे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तांबे भाजपमध्ये आल्याने जिल्हयातील काही नेत्यांची अडचण मात्र होणार आहे. ही अडचण होऊ नये म्हणून काहींनी दिवसा तांबे यांचे समर्थन करून रात्री महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post