अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे समजली जाणारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेकांनी आटापिटा केला. मात्र फक्त दोन जागा बिनविरोध झाल्या असून स्वत: मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष घातल्यामुळे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांची इच्छा असूनही आपल्या कार्यकर्त्यांना संधी देता आली नाही. एकप्रकारे आमदार पाचपुते नेत्यांच्या दबावापुढे हतबल झाल्याचे दिसून आले.
खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी चंग बांधला होता. पण काहींनी सोशल मीडियावर आपल्या ज्येष्ठ नेत्यांच्या शपथा घेत पक्षाचा स्वतंत्र पॅनल उभा करण्याची वलग्ना केल्या होत्या.
पण तेच आज बिनविरोधसाठी नेत्यांंचे उंबरठे झिजवताना दिसले. या प्रतिक्रियेत नागवडे गटाने अतिशय सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. माजी आमदार राहुल जगताप यांनी आपल्या दोन कार्यकर्त्यांच्या जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे. पण संघाची निवडणूक अखेर लागलीच.
खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध होण्याचा इतिहास आहे. पण यावर्षी नेत्यांनी कार्यकर्ते अक्षरक्षः वार्यावर सोडले सर्व काही नेत्यांनी ठरवून घेतले. ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
त्यांना आज सकाळी बोलवून घेत माघारीच्या अर्जावर स्वाक्षरी करा, असे आदेश दिले. पण माघारी कोणत्या उमेदवारासाठी घ्यायची हे सांगितले नाही. नेत्यांनी या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भावनाच जाणून घेतल्या नसल्यामुळे सर्वच पक्षात नाराजीचा सूर उमटला आहे.
त्यात भर म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे चिरंजीव यांनी या निवडणुकीत हस्तक्षेप केला असल्याचे जबाबदार पदाधिकार्याने सांगितले. मुख्यमंत्री यांचा हस्तक्षेप असल्यामुळे पाचपुते यांना इच्छा असतानाही आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देता आली नाही. काही कार्यकर्त्यांनी तर थेट आगामी निवडणुकीत आम्ही घरात सू असेच सांगून टाकले.
या प्रक्रियेत पाचपुते यांचे पुत्र प्रतापसिंह पाचपुते यांनी पूर्ण लक्ष घातले होते. पण त्यांचाही नाईलाज झाला. फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यातही एक जागा शिंदे गटाला दिली आहे.
पण एकंदरीत आजच्या घडामोडीचा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.
Post a Comment