नगर ः जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात अनेक नियमबाह्य कामे झालेली आहेत. ही कामे गेल्या सहा महिन्यांमध्ये सर्वाधिक झाल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे. या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेतून होत आहे. चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक राज सुरु आहे. या प्रशासक राज काळात अधिकाऱ्यांनी चांगले कामे करून आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र यामध्ये काही विभागातील अधिकाऱ्यांनी चांगले काम केलेले आहे. तर काही अधिकाऱ्यांनी मनमानी पध्दतीने कारभार करून काही कर्मचाऱ्यांना सुखी तर काहींना दुःखी केलेले आहे. याबाबत सध्या जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा सुरु आहे.

Post a Comment