पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहाटेच्या शपथविधी विषयी जे गौप्यस्फोट करत आहेत, त्याविषयी मी काहीच बोलणार नाही, असे विरोधीपक्षनेते अजित पवार पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी केलेल्या गौप्यस्फोटानंतर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
देवेद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबाबत प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 'मी तुम्हाला जवळपास दोन वर्षा आधी देखील हे सांगितले होते.. त्यामुळे आता देखील मी त्या शपथविधीवर काही बोलणार नाही', अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले की ईडीची अटक टाळण्यााठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भाजपमध्ये येण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. याविषयी मी बोलण्यापेक्षा स्वतः अनिल देशमुखच माझ्यापेक्षा अधिक विश्वासहार्यतेने बोलू शकतील, असे देखील अजित पवार म्हणाले.
जे बोलले त्यावर ठामपणे कायम अजित पवार रहात आहेत. त्यांचे हे धोरण सर्वांना आवडत आहे. त्यामुळे ते लोकप्रिय आहेत.
Post a Comment