जळगाव : कोट्यवधी रुपयांची काम झाली. याला म्हणतात काम. होय आम्ही खोक्या वाले. 370 खोके आज आम्हाला मतदार संघात दिले, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर एक शब्द वारंवार चर्चेत येत आहे. तो म्हणजे 'खोके'. ठाकरे आणि विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारचा खोके सरकार असा उल्लेख केला जातो. '50 खोके एकदम ओके' अशी घोषणाही विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी गाजली होती.
शिंदे गटाकडून मात्र या शब्दाला नेहमीच विरोध करण्यात आला आहे. मात्र, आता शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे जाहीर कबुल केले आहे. 'होय, आम्ही खोकेवाले' असा उल्लेख त्यांनी जाहीर सभेत बोलताना केला आहे. जळगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जमीर बेचने वालोसे हम दोस्ती नही करते, वरना वक्त से पहले अमीर होते, अशा वाक्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
गुलाबराव पाटील म्हणाले की, कोट्यवधी रुपयांची काम झाली. याला म्हणतात काम. होय आम्ही खोक्या वाले. 370 खोके आज आम्हाला मतदार संघात दिले. माझ्या मतदार संघात दिलेला पुल राष्ट्रवादीवाले वापरणार नाही का? पाणी ते पिणार नाही का? पियो पाणी, पाणी पिला पीला के मारो.
मी मंत्री असून मला चिमणराव आबा इतका निधी दिला नाही, अशी टीका करत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांनी काम पाहून बोला असं आव्हान दिलं आहे. मी बोलणार नव्हतो. पण साहेबांनी आदेश दिला बोल. मंत्री राहायच आहे म्हणून बोललो. नाहीतर आजा मेरी गाडी मे बेठ जावो होईल, अशी मिश्किल टीप्पणीही पाटील यांनी केली.
Post a Comment