या प्रकरणी कृष्णा सुधाकर ठोंबरे (वय 30 रा. दासखेड, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी फिर्याद दिली. त्यानंतर तरुणांना लुटणार्या दोघांना कोतवाली पोलिसांनी दोन तासात ताब्यात घेत अटक केली आहे.
दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्ष्यात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस अंमलदार योगेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए.पी. इनामदार, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, संदीप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ यांचे पथकाने लुटारूंचा शोध सुरू केला.
तांत्रिक तपास व खबर्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवर रात्री परवेज सय्यद व सोहेल शेख हे फिरत होते. व ते दौंड रोडने नगर शहराच्या दिशेने टिव्हीएस स्टार सीटी दुचाकी (एमएच 16 झेड 3553) वरून येत आहेत, अशी माहिती निरीक्षक शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी डिबी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या.
डिबी पथकाने दोघांना शिताफीने ताब्यात घेतले व त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे जवळ देशी बनावटीचा एक गावठी कट्टा व चोरीचे एक हजार 200 रूपये मिळून आले. पोलिसांनी ते हस्तगत केले आहे. अटक केलेल्यांनी या अगोदर कोणाला कोणाला लुटले याचा तपास पोलिस करीत आहेत.
Post a Comment