सायकलीच्या वादातून तरुणाची हत्या...

राहाता : लहान मुलाने दुचाकीला सायकल आडवी घातल्याच्या किरकोळ वादातून २० वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना राहात्यात घडली आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. 


राहाता शहारानजीक पंधरा चारी शिवारात शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास २० वर्षीय रोहित वर्मा नामक तरुणाच्या दुचाकीला शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलाने सायकल आडवी घातली होती. 

या किरकोळ कारणातून वाद झाल्याने संबंधित लहान मुलाचा मोठा भाऊ अरबाज शेख याने आपल्या साथीदारांच्या मदतीने रोहितला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली आहे.

जीव वाचवण्यासाठी रोहित वर्मा हा बाजूच्या शेतात पळाला असता आरोपी अरबाज आणि साथीदारांनी पाठलाग करत रोहितवर धारदार शस्राने वार करून त्याची हत्या केली आहे. हत्येच्या या थराराने राहाता शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी अरबाज शेख याला बेड्या ठोकल्या असून साथीदारांचा शोध पोलीस घेत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post