बैलागाडा शर्यतीत एकाचा मृत्यू...

सातारा : साताऱ्यात बैलगाडी खाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. या बैलगाडी शर्यतीसाठी परवानगी घ्यावी लागते. पण, या शर्यतीत परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली.


बैलांच्या शर्यती धोकादायक असल्याने मध्यंतरी न्यायालयाने त्यावर बंदी आणली होती. पण, त्यांना अखेर न्यायालयाने मान्यता दिली. या शर्यतीत बैलांवर अत्याचार होतो, असा काहींचा आक्षेप होता. आता बैलांच्या शर्यती राज्यात सुरू आहेत. या शर्यतीदरम्यान सातारा येथे ही घटना घडली. 

साताऱ्यातील बोरखळ येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुष्कर पवार असे या तरुणाचे नाव आहे.

दोन बैलगाडींची धडक होवून अपघात झाला. बैलगाडीचं चाक अंगावरून गेल्याने या तरुणाचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आहे. या तरुणाचा मृतदेह साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. 

साताऱ्यात बैलगाडी खाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. या बैलगाडी शर्यतीसाठी परवानगी घ्यावी लागते. पण, या शर्यतीत परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post