पोलिस हवालदार लाचलुचपत पिरतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला....

नगर : तांदूळ प्रकरणात अटक न  करण्यासाठी ५० हजाराची मागणी करणार्या कोतवाली पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार एकनाथ पंडित निपसे, (वय - ४२) लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात अडकला आहे. 


याबाबत माहिती अशी की तक्रारदार यांचे त्यांचे राहते गावी किराणा दुकान आहे. ते किराणा सामान व धान्य विक्री करतात तसेच गावातील काही लोक मुलांना शाळेत मिळालेला तांदूळ त्यांचे दुकानात आणुन विकतात. असा विकत घेतलेला तांदूळ ते नगर मार्केट यार्ड मधील एका व्यापा-याला विकतात. 

मागील तीन चार महिन्यांपूर्वी सदर व्यापारी याचे दुकानावर कोतवाली पोलिसांनी धाड टाकून त्यांचेकडे काळे बाजारातील तांदुळ मिळून आले म्हणून गुन्हा दाखल केला होता व त्यास अटक केली होती. 

अटके दरम्यान त्या व्यापा-याने तक्रारदार यांचे कडुन तांदूळ विकत घेतल्याचे सांगितले वरुन आरोपी लोकसेवक याने तक्रारदार व त्यांचे मुलास आज रोजी बोलावून घेतले व त्यांचे मुलास या गुन्ह्यांमध्ये आरोपी न करणेसाठी व अटक न करणे साठी ५० हजाराची मागणी केली. अशा‌ आशयाची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. 

सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी पोलीस स्टेशन कोतवाली येथे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे कडे ५० हजाराची मागणी केली, दरम्यान आरोपी लोकसेवक यास तक्रारदार व पंच यांचे बाबत संशय आलेने, आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांना एका खोलीत नेऊन, दरवाजा बंद करून त्यांची अंगझडती घेतली असता त्यास तक्रारदार यांचे कपड्यांचे आतमध्ये लपविण्यात आलेले डिजिटल व्हाइस रेकॉर्डर मिळून आले. 

ते व्हाइस रेकॉर्डर आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचेकडून बळजबरीने हिसकावून घेऊन पोलीस स्टेशनमधून पळुन गेला आहे. आरोपी लोकसेवक याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही,  म्हणून त्यांचे विरुद्ध आज रोजी तक्रारदार यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन कोतवाली येथे  लाचेची मागणी करणे, व्हाइस रेकॉर्डर बळजबरीने हिसकावून घेऊन जाऊन पुरावा नष्ट केला म्हणून १७ फेब्रुवारी २०२३ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ व भारतीय दंड विधान कलम ३९२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद गोर्डे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post