पुणे : शिवसेना नेता आणि माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यावर पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये एका महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तर याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सोलापूर येथील रहिवासी उत्तम प्रकाश खंदारे (वय 65) व त्यांचा साथीदार महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्यासह उत्तम प्रकाश खंदारे यांच्या महिला सहकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण बी रेस्ट हाऊस आणि बिबवेवाडी येथे 2012 मध्ये सुरू झाले होते.
त्यानंतरही सुरूच राहिले होते. तब्बल 11 वर्षांनंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
Post a Comment