नगर : बाबुर्डी बेंद (ता. नगर) शिवारात शेतीच्या वादातून बुधवारी (ता. ८) दुपारी खुनी हल्ला झालेल्या नगरमधील बांधकाम व्यावसायिकावर आता चाकूने मारहाण आणि अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या हाणामारीत जखमी झालेल्या दीपक भिमराव साळवे, (वय २९, रा. बाबुर्डी बेंद ता.नगर) याने नगर तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.९) रात्री फिर्याद दिली आहे.
नगरमधील बांधकाम व्यावसायिक व शेती मालक उत्कर्ष सुरेश पाटील (वय ४४, रा.श्रमिक, आनंदऋषीजी मार्ग,अहमदनगर) आणि त्याच्या साथीदारांवर २० ते २५ जणांच्या जमावाने बुधवारी (ता. ८) दुपारी तुफान दगडफेक केली होती. तसेच पाटील यांच्यावर कोयत्याने वार करत त्याच्या जवळ असलेली परवाना असलेली रिव्हॉल्वर हिसकावून घेत त्याच्या डोक्यास लावून ठार मारण्याचीही धमकी देत आरोपींनी त्यांची रिव्हॉल्वर पळवून नेली होती.
याप्रकरणी या प्रकरणी उत्कर्ष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मनोज चोभेसह २० ते २५ जणांच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दत्तात्रय उर्फ मनोज बाजीराव चोभे (रा.बाबुर्डी, ता.नगर), संदीप रावसाहेब कासार (रा. वाळकी,ता.नगर), अनिल नारायण उमाप (रा.खडकी, ता.नगर), आदित्य बाळासाहेब बांदल, नितीन रमेश राऊत (दोघे रा. हॉटेल राजवीर, बाबुर्डी बेंद, ता.नगर) या ५ जणांना नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग अटक करण्यात आली होती. गुरुवारी (दि.९) दुपारी न्यायालयाने या आरोपींना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे.
दरम्यान या हाणामारीत जखमी झालेल्या दिपक भिमराव साळवे याच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याने गुरुवारी (ता. ९) रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक उत्कर्ष सुरेश पाटील (वय ४४, रा.श्रमिक, आनंदऋषीजी मार्ग,अहमदनगर) आणि त्याच्या इतर २ साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
त्या दिवशी आपण हा त्याचे घरासोमरील गोठ्यात जनावरांना चारा टाकत असताना त्या ठिकाणी यातील आरोपी आले व मला म्हणाले की मला घर बांधण्यासाठी विरोध का करतो असे, म्हणून आपल्या डोक्यात, डाव्या पायाच्या घोट्यावर चाकु मारुन आपणास व आपल्या आईला जातीवाचक शिविगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. असे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी उत्कर्ष पाटील व अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment