नगर : नागरदेवळे (ता. नगर) गावात विकास कामांचा धुमधडाका सुरु आहे. नागरदेवळे गावासाठी एक कोटी रुपयांचा निधी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाला आहे, अशी माहिती माजी सरपंच राम पानमळकर यांनी दिली
पानमळकर म्हणाले की, शिंदे फडणविस सरकारच्या माध्यमातून व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून नागरदेवळे गावासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पानमळकर म्हणाले की, ग्रामपंचायत नागरदेवळे अंतर्गत आलमगिर चौक ते ग्रिन चौक रस्ता डांबरीकरण करणासाठी १० लाख, ग्रामपंचायत नागरदेवळे अंतर्गत विवेक बिडवाई दुकान ते आलमगिर चौक रस्ता डांबरीकरण करण्यासाठी १० लाख, ग्रामपंचायत नागरदेवळे अंतर्गत शिंदे सर यांच्या घरापासून नायकू यांच्या घरापर्यत (लक्ष्मीनगर) रस्ता कॉक्रेटीकरण करण्यासाठी १० लाख, ग्रामपंचायत नागरदेवळे अंतर्गत गावठाण मंजिद जवळ रस्ता काॕक्रेटिकरण करण्यासाठी ५ लाख, ग्रामपंचायत नागरदेवळे अंतर्गत उपनगर अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी २० लाख, ग्रामपंचायत नागरदेवळे अंतर्गत पानमळकर मळा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी १० लाख, ग्रामपंचायत नागरदेवळे अंतर्गत मथुरानगरी अंतर्गत रस्ता कॉक्रेटीकरण करण्यासाठी १० लाख, ग्रामपंचायत नागरदेवळे अंतर्गत नागरदेवळे फाटा ते पाण्याच्या टाकीपर्यत रस्ता डांबरिकरण करण्यासाठी २५ लाख रुपये मंजूर झाला आहे.
ही सर्व कामे मंजूर करुन आणल्याबद्दल व दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नागरदेवळे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे, असे पानमळकर यांनी म्हटले आहे.
Post a Comment