नगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक अवघ्या काही लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु या निवडणुका या ना त्या कारणाने पुढे ढकलल्या गेल्या आहेत. परंतु आता निवडणुकांची आचारसंहिता लवकरच लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
जिल्हा परिषदेतील पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपून एक वर्ष होत आले आहे. या कार्यकाळात प्रशासक कामकाज पहात आहे. मागील वर्षी फेब्रुवारीत कार्यकाळ संपत येत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी विकास कामांचे उरकून घेण्यावर सदस्यांनी भर दिला होता.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम लवकरच बिगूल वाजणार आहे. या आशेवर अनेकजण अद्यापही बसलेले आहेत. काहींनी मागील वर्षीच आपल्या गटात व गणात काय आरक्षण पडेल, याचा अंदाज काहींनी घेऊन त्यानुसार काहींनी आतापासूनच डावपेच टाकले होते.
आपला गट व गण आरक्षीत झाला तरी काहीजण शेजारील गट व गणात जाऊन निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरु केलेल्या होत्या. काहींनी गट गेला तरी गणातून निवडून येऊन पंचायत समितीच्या माध्यमातून गावात व गटात व गणात कामे करण्याचे नियोजन सुरु केलेले आहे.
त्यासाठी घरातील इतर लोकांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याची तयारी केलेली आहे.काहींनी तर आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तर प्रतिस्पर्ध्याला कसे नामोहरण करायचे याचेही डावपेच आखून ठेवलेले आहे.
परंतु निवडणूक जाहीर झालेली नाही. ती एप्रिलमध्ये जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.
Post a Comment