दुर्गम भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना आ. नीलेश लंकेंच्या वाढदिवसाला ५ हजार सायकलींचे वाटप होणार....

पारनेर : पारनेर मतदार संघातील दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश सिंग यांनी १० मार्च रोजी आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आपल्या मतदारसंघातील ५ हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.


येत्या १० मार्च रोजी आ. नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने मतदारसंघातील पाच हजार शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात येणार आहे. 

आ. लंके यांचा वाढदिवस असला तरी ते कोणतेही गिफ्ट स्विकरणार नसून गिफ्ट देऊ इच्छिणार्यानी सायकल खरेदीसाठी मदत करण्याचे अवाहन आ. निलेश लंके यांनी केले आहे.

आ. नीलेश लंके यांनी यासंदर्भात कार्यकत्यांना आवाहन करणारे एक पत्र आपल्या सहीनिशी प्रसारीत केले आहे. त्यात नमुद करण्यात आले आहे की, पारनेर-नगर मतदार संघातील गरीब, निराधार कुटूंबातील विद्यार्थी, विद्यार्थीनी जे ३ किलोमिटरपेक्षा जास्त पायी प्रवास करून शालेय शिक्षण घेत आहेत अशा पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना

१० मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ५ हजार सायकचे वितरण करण्याचा आपण संकल्प केला आहे. यापुढील काळात आपणास कोणत्याही प्रकारची भेट वस्तू देण्यासाठी आणून नये. आणली तरीही ती आपण स्विकारणार नाही. मला माझ्यासाठी काहीही नको. मला फक्त गोरगरीब, निराधार विद्यार्थ्यांसाठी मदत हवी आहे. 

ज्या दानशुर,दातृत्ववान व्यक्तींना मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या इच्छेनुसार शक्य होईल तेवढ्या सायकल किंवा सायकल घेण्यासाठी इच्छेनुसार आर्थिक मदत करण्याचे जाहिर आवाहन लंके यांनी केले आहे. गरीब गरजू, निराधार मुला-मुलींना सायकल घेण्यासाठी दिलेली मदत हीच माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान ठरेल. 

आपल्या सर्वांच्या सहकार्याने गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शाळेच्या प्रवासाचा मार्ग सुखकर होण्यासाठी आपण एकोप्याने मतद करू या एवढीच माफक अपेक्षा आ. लंके यांनी व्यक्त केली आहे. ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयाशी अथवा माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधण्याचे आवाहनही आ. लंके यांनी केले आहे.

वाढदिवस म्हणजे केवळ केक हार शाल बुके नव्हे तर वाढदिवसाला विधायक व सामाजिक कार्याची जोड देऊन माझ्या मतदारसंघातील दुर्गम आदिवासी व ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना ३ किलो मीटर अंतरावरून शिक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे. 

त्या ५ हजार शालेय विद्यार्थ्यांना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या सायकलची वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते वितरण केले जाणार आहे. 

गेल्या वाढदिवसाला महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांचे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या वाढदिवसाला शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे गिफ्ट देण्याचे ठरवले असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post