मुंबई : जिओने नेहमीच ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. तसेच आकर्षक सवलतीही रिचार्जवर दिलेल्या आहेत. आता ग्राहकांना परवडतील अशा योजना जिओने आणल्या आहेत.
जिओचा ७१९ रुपयांचा प्रिपेड प्लनची वैधता ८४ दिवसाची आहे. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. सोबत १०० एसएमएस रोज मिळतात. या प्लँनमध्ये २ जीबी डेटा रोज दिला जातो.
दररोज २ जीबी या हिशोबानुसार, १६८ जीबी डेटा या प्लान मध्ये मिळतो. या प्लँनमध्ये जीओ टिव्ही, जिओ सिनेमा, आदी चे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते.
जिओचे २९९ रुपयांचे प्रिपेड प्लँन ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहे. कमी किंमतीत जास्त सुविधा या प्लानमध्ये मिळतात. रोज २ जीबी डेटा या प्लानमध्ये दिला जातो. सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा या प्लानमध्ये दिली जाते. यात दररोज 100 SMS सुद्धा मिळतात. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे.
जिओचा १७९ रुपयांचा प्रिपेड प्लन सुद्धा या लिस्टमध्ये समावेश आहे. या प्लानची वैधता २४ दिवसाची आहे. यात दररोज १ जीबी डेटा दिला जातो. सोबत यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते.
हा प्लान सुद्धा १०० एसएमएस रोज ऑफर करतो. या प्लँनमध्ये जीओ टिव्ही, जिओ सिनेमा, आदी चे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते. कमी किंमतीत जास्त फायदा मिळत असल्याने हे प्लँन नेहमीच चर्चेत असतात.
Post a Comment