मुंबई : पवार साहेब असं कधीच करणार नाहीत. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीसांनी जाणीवपूर्वक हे विधान केले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.
अजित पवारांसोबत झालेला सकाळचा शपथविधी शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतरच झाला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांचे हे आरोप शरद पवारांनी फेटाळून लावले आहेत.
'मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची स्टेटमेंट्स करतील, असं मला कधी वाटलं नाही, असे म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Post a Comment