नगर : लेखाशिर्ष 2515 मधून कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी 5 कोटींचा निधी आणल्यानंतर काही तास उलट नाही तोच मतदारसंघातील 26 गावांमधील सिंगलफेज आणि थ्री फेज डिप्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे पुढे सरसावले आहेत.
मतदारसंघातील शेतकऱ्यांची अन् जनतेची विजेच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी, आमदार राम शिंदे यांच्या कार्यालयाने जिल्हा नियोजन समितीकडे 2 कोटींच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला आहे.
आमदार राम शिंदे यांच्या विकास कामांचा झंझावात पुन्हा एकदा मतदारसंघात निर्माण झाला आहे. आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार आता घेतला आहे.
मतदारसंघात नवीन रोहित्र बसवण्याची मागणी शेतकरी, नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीची आमदार राम शिंदे यांनी तातडीने दखल घेत मतदारसंघातील 26 गावांमध्ये नव्या रोहित्र बसवावे यासाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.
Post a Comment