मतमोजणी अगोदरच तांबे विजयीचे फलक...

नगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या लक्षवेधी निवडणुकीच्या निकाला कडे राज्याचे लक्ष आहे. मतमोजणी सुरु होण्याच्या अगोदरच सत्यजित तांबे यांमा शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहे. या फलकांवर तांबे यांना आमदार म्हणण्यात आलेेले आहे.


अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांच्यात मुख्य लढत झालेली असताना आज होणाऱ्या मतमोजणीच्या नंतर विजयाची कोण बाजी मारणार याची मोठी उत्सुकता आहे. मात्र मतमोजणी सुरू होण्यागोदरच पुण्यासह अहमदनगरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विजयाचे फलक(फ्लेक्स) लावण्यात आले आहेत. 

 "जित सत्याची, विजय नव्या पर्वाचा" असा ठळक उल्लेख फ्लेक्सवर करण्यात आला आहे. आमदार सत्यजित तांबे असाही उल्लेख या फलकांवर केलेला आहे. 

नाशिक पदवीधरच्या निकालाची उत्सुकता असली तरी यात सत्यजित तांबे आरामात एकतर्फी बाजी मारतील असे बोलले जाते, मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या मविआ पुरस्कृत शुभांगी पाटील यांनीही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक झाली त्यात जनशक्ती आपल्या पाठीशी राहिल्याने आपलाच विजय होईल असा विश्वास मतमोजणी केंद्रावर पोहचल्या नंतर केला आहे. पाटील मतमोजणी केंद्रावर पोहचल्या असल्या तरी सत्यजित तांबे अजून केंद्रावर आलेले नसून दुपारी तीन नंतर ते मतमोजणीच्या ठिकाणी येतील असे सांगितले जात आहे.

ही निवडणूक चांगलीच गाजली आहे. आगामी काळात या निवडणुकीवर चर्चा होणार असली तरी त्याचे राजकारण खूप पडसाद पडणार आहे. या निकालानंतर चांगल्याच राजकीय घडामोडी होणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post