नाशिक : नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले आहे. मानस पगार हे युवक काँग्रेसमधील चर्चेतला चेहरा म्हणून ओळखले जायचे. तसेच सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
काँग्रेसची भूमिका सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे मांडत. त्यामुळे पक्षानेही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनानंतर सत्यजीत तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली. माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे", या शब्दात सत्यजीत तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे.
Post a Comment