भाजपची थोरातांना ऑफर!

मुंबई ः काँग्रेसमध्ये सध्या उघड उघड दोन गट पडल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्याबाबत पक्षाकडे नाराजी व्यक्त केली होती.


सत्यजित तांबे यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेसमधील जे स्थान आहे, त्यापेक्षा आमच्या पक्षात नककीचे मोठे स्थान राहील याची काळजी घेऊ असेही बावनकुळे यांनी म्हंटले आहे. एकंदरीत भाजपचे बावानकुळे यांनी थोरातांना ऑफरच दिली आहे.


काँग्रेसमधील वाद विकोपाला गेलेला असतांना बावनकुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. त्यावर थोरात आणि तांबे यांना दिलेली ऑफर बघता येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post