नगर : जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकेचा गेल्या महिन्यात हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या बदलीचा आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून काढण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.निधन होऊन दीड महिना उलटल्या नंतरही 6 फेब्रुवारी रोजी त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहे.
याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. या बदलीच्या आदेशामुळे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासनाचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. सोबतच्या यादीतील अनुक्रमांक 26 मध्ये नाव आले आहे.
यामुळे शिक्षक व जिल्हा प्राथमिक शिक्षण विभाग यांच्यात समन्वय नसल्याचे परत एकदा सिद्ध झाले. मृत्यूनंतरही दीड महिन्याने बदलीचे आदेश निघाल्याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
Post a Comment